logo

राज्यस्तरीय मुला-मुलींचे ॲथलेटिक्स स्पर्धेचे सणस मैदान स्वारगेट पुणे येथे आयोजन करण्यात आले होते

श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व आय ई डी एस एस ए यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे सणस मैदान येथे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन श्री मारुती रामचंद्र भूमकर संस्थापक अध्यक्ष श्रीरामचंद्र कॉलेज इंजिनिअरिंग यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉ. सुषमा तायडे क्रीडा संचालिका यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की यशाची सुरुवात कृतीने होते म्हणजेच ज्या क्षणी तुम्ही सुरुवात केली त्या क्षणी यशाची सुरुवात झाली राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा हा मंच तुम्हा सगळ्यांसाठी स्पर्धेच्या प्रवेशद्वार ठरणार आहे कोणत्याही देशाची प्रगती आणि जगात त्याच्याबद्दलचा आदर याचा थेट संबंध हा क्रीडा क्षेत्राशी असतो देशात अनेक ठिकाणी क्रीडा विद्यापीठ उभारले जात आहे तसेच क्रीडा क्षेत्रासाठी अनेक आधुनिक साहित्य व क्रीडा मैदाने उभारली जात आहे शेवटी मला तुम्हा सर्वांना एकच मंत्र द्यायचे आहे खेळातील पराभव आणि विजयाला आपण कधी शेवटचे मानू नये ही क्रीडा भावना तुमच्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे या ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून म्हणजे 14 झोन मधून अनेक प्रथम क्रमांकाचे विजयी खेळाडू या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित राहिले ही स्पर्धा सकाळी आठ वाजता चालू झाली यामध्ये राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंनी भाग घेऊन आपली प्रतिभा या ठिकाणी दाखवली 100 , 400, 1500 मीटर धावणे, रिले स्पर्धा ,हाय जंप, लॉंग जंप ,शॉर्टफुल डिस्कस थ्रो जावलींग थ्रो असे अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी भाग घेऊन विजय मिळवला आहे यासाठी पंच म्हणून नाना ताकवणे सर तसेच इतर पंचांनी या स्पर्धेचे कामकाज पाहिले या अथलेटिक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना प्रथम व द्वितीय क्रमांक मिळून आपली प्रतिभा दाखवली अशा खेळाडूंचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूट चे प्रीती डावरे व इतर मान्यवर मयुरा पांडे अनिल जमदाडे माळी सर खेडेकर सर गुणवरे सर अनेक खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते

3
609 views